
धरणगाव (प्रतिनिधी) माझ्यावर टीका करण्याआधी उदय वाघ यांनी लोकसभेच्या वेळी अमळनेर येथील युतीच्या कार्यकर्त्या मेळाव्यात स्टेजवर काय बोंब पाडली आधी ते सांगाव? आणि मग माझ्यावर टीका करावी, असे रोखठोक प्रतिउत्तर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’ शी बोलताना दिली आहे.
ना.पाटील यांची मंगळवारी धरणगाव तालुक्यातील सोनवद येथे जाहीर सभा झाली. सभेनंतर त्यांनी ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’ प्रतिनिधीशी संवाद साधला. यावेळी ना.पाटील यांनी उदय वाघ यांच्या टीकेचा जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले की, उदय वाघ यांनी माझ्यावर टीका करण्याआधी त्यांची निष्ठा तपासावी. आगामी काळात जनता मला पुन्हा आशीर्वाद देणार आहे. त्यानंतर मतदार संघातील शेतरस्ते, सिंचनाचे प्रश्न मी मार्गी लावणार आहे. लोकांचा मला पाठींबा आहे. आणि मीच विजयी होणार, असे देखील ना. पाटील यांनी म्हटले आहे.