Home Cities जळगाव चित्रकार दिनदर्शिकेचे ना. गिरीष महाजन यांच्या हस्ते प्रकाशन

चित्रकार दिनदर्शिकेचे ना. गिरीष महाजन यांच्या हस्ते प्रकाशन


जळगाव (प्रतिनिधी) शहरात कार्यरत असलेल्या उल्का फॉउंडेशन च्या अभिनव संकल्पनेतून प्रथमच “चित्रकार दिनदर्शिका” साकारली गेली आहे. सदर दिनदर्शिकेचे प्रकाशन वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री ना. गिरीषभाऊ महाजन यांच्या हस्ते नुकतेच करण्यात करण्यात आले.

जळगाव जिल्ह्यातील चित्रकार दत्तात्रय शेळके, आनंद माळी, दिनेश पाटील, अर्जुन बाविस्कर यांच्या निसर्गचित्रांचा समावेश “चित्रकार दिनदर्शिकेत” करण्यात आला आहे. या प्रसंगी चित्रकार अर्जुन बाविस्कर यांचे निसर्गचित्र उल्का फॉउंडेशनतर्फे ना. गिरीषभाऊ महाजन यांना भेट म्हणून देण्यात आले. चित्रकार दिनदर्शिकेच्या प्रकाशन प्रसंगी आ. राजुमामा भोळे, स्थायी समिति सभापती जितेंद्र मराठे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, सभागृह नेते ललित कोल्हे, उद्योजक श्रीरामभाऊ खटोड, नगरसेवक अतुलसिंह हाडा, विशाल त्रिपाठी,पिंटूभाऊ काळे व इतर मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाचे कौतुक स्थानिक चित्रकारांकडून होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound