Home Cities जळगाव जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत भाग्यश्री पाटील तेरावी

जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत भाग्यश्री पाटील तेरावी

0
51

WhatsApp Image 2019 10 13 at 2.12.49 PM

जळगाव, प्रतिनिधी | मुंबई पवई येथे झालेल्या जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या भाग्यश्री पाटील १४ मुलींच्या वयोगटात ६ विजय २ बरोबर ३ पराभूत असे ७ गुण मिळून तेरावी आली.

भाग्यश्री पाटील हिचा ११ व्या फेरीअखेर आठवा क्रमांक लागला होता. शेवटच्या डावात गेम जिंकल्यास तीचा ५ वा क्रमांक लागणार होता परंतु, शेवटची फेरीत पराभूत झाल्यामुळे तिचा १३ वा नंबर आला. तिच्या वयोगटात ८२ स्पर्धकांचा सहभाग होता. १४,१६,१८ मुलं-मुली ६ वयोगटात ६५ देशातील ५०० खेळाडूंचा सहभाग होता. जागतिक युवा जूनियर २० वयोगटाचे बुद्धिबळ स्पर्धा १५ तारखेला दिल्ली येथे होणार आहे. त्यात भाग्यश्री एकोणवीस वयोगटात भारतातून निवड झाली आहे. भाग्यश्रीच्या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जैन स्पोर्ट्सचे अध्यक्ष अतुल जैन यांनी अभिनंदन व पुढील स्पर्धेच्या शुभेच्छा दिल्या.


Protected Content

Play sound