Home Cities जळगाव अभिषेक पाटील यांना राष्ट्रीय दलीत पँथरचा पाठींबा

अभिषेक पाटील यांना राष्ट्रीय दलीत पँथरचा पाठींबा

0
40

abhishek patil pathimba

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी, काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीचे जळगावातील उमेदवार अभिषेक पाटील यांना आज राष्ट्रीय दलीत पँथर संघटनेने पाठींबा जाहीर केला आहे.

राष्ट्रवादी, काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीतर्फे जळगावातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अभिषेक पाटील यांना परिवर्तनाचा नारा बुलंद करून शहरातून जोरदार प्रचारास प्रारंभ केला आहे. ते शहराच्या कान्याकोपर्‍यात जाऊन जनतेच्या समस्या जाणून घेत आहेत. तर दुसरीकडे विविध सामाजिक संघटना आणि मान्यवरांचा पाठींबादेखील त्यांना मिळत आहे. या अनुषंगाने आज राष्ट्रीय दलीत पँथर संघटनेने त्यांना जाहीर पाठींबा दिला आहे. पक्षाच्या जिल्हा कार्यालयात या संघटनेतर्फे पाठींब्याचे लेखी पत्र त्यांना प्रदान करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री गुलाबराव देवकर, ज्येष्ठ पदाधिकारी नामदेवराव चौधरी,लिलाधर तायडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

याप्रसंगी राष्ट्रीय दलीत पँथर संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सोनवणे, जिल्हाध्यक्ष राजुभाऊ महाले, जिल्हा संघटक रवी सोनवणे, महानगराध्यक्ष शांताराम अहिरे आणि जिल्हा नेते भीमराव सोनवणे आदींची उपस्थिती होती. या मान्यवरांतर्फे सादर करण्यात आलेल्या निवेदनात अभिषेक पाटील यांना पाठींबा देऊन त्यांच्या प्रचारात सक्रीय सहभाग घेत त्यांना निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound