जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील आव्हाने गावात आज अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचारात पी. सी. आबा पाटील,लकी टेलर तसेच जानकीराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झंझावाती प्रचार दौरा झाला. अत्तरदेंसाठी तिघं नेते थेट मैदानात उतरल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
जळगाव ग्रामीणच्या विकासाचा ध्यास घेतलेले अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचा आव्हाने गावात झंझावाती प्रचार दौरा आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास पार पडला. यावेळी गावातील महिलांनी चंद्रशेखर अत्तरदे व माधुरीताई अत्तरदे यांचे फुलहार घालून स्वागत केले. यावेळी भाजप नेते पी. सी. आबा पाटील, जळगाव बाजार समितीचे माजी सभापती लकी टेलर उर्फ लक्ष्मण गंगाराम पाटील तसेच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जानकीराम पाटील यांनी प्रमुख उपस्थिती लावल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. यावेळी या तिघं नेत्यांनी चंद्रशेखर अत्तरदे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी आव्हाने शक्ति प्रमुख चेतन सोनवणे, बूथ प्रमुख सचीन पाटील, भूषण पाटील, विशाल नन्नवरे, अनिल भागवत तसेच राकेश नन्नवरे (सरपंच, बांभोरी तथा तालुका सरचिटणीस, भाजपा युवा मोर्चा), निर्दोष पाटील (सरपंच, सोनवद) आणि आव्हाने गावचे सरपंच, ग्रा. प. सदस्य, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.