पहूर, ता.जामनेर (प्रतिनिधी)। पहूर येथे चाकूचा धाक दाखवून वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली असून दोन जणांविरुद्ध पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गावातील पावर हाऊस झोपडपट्टी भागात राहणाऱ्या वीस वर्षीय एका तरूणीला संशयित आरोपी गौरव राजू कुमावत, भिक्या तडवी पुर्ण नाव माहित नाही दोन्ही राहणार पावर हाऊस झोपडपट्टी यांनी गुरूवार 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 ते 3 वाजेच्या सुमारास बळजबरीने रिक्षात बसून घेऊन गेले. दोघांनी रिक्षा भारूडखेडा शिवारात असलेल्या एका झोपडीत नेत तिला चाकूचा धाक दाखवत दोघांनी बलात्कार केला. पिडीत तरूणीच्या फिर्यादीवरून पहूर पोलीसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे हे करीत आहे.