भुसावळ प्रतिनिधी । शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर दोन दिवसीय शास्ता धम्म संमेलनास आजपासून प्रारंभ झाला आहे.
शास्ता धम्म संमेलनाच्या पहिल्या दिवशी धम्मध्वजाचे ध्वजारोहण अध्यक्ष भदंत नापावल पय्यातिसजी महास्थवीर व पूज्य भदंत संघ यांच्या हस्ते करण्यात आले. दुसर्या सत्रात चिवर अर्थात अष्टपरिष्कार दान समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी भदंत नापावल महास्थवीर यांनी चिवर दानाचे महत्व उपस्थित उपासकांना सांगितले. चिवर दानामुळे दान करणार्या कुटूंबातील पिढ्या प्रज्ञावंत होतात, अनंत जन्मांचे पुण्य त्यांना मिळते. यामुळे या दानाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. संमेलनाच्या दुसर्या दिवशी रविवारी सकाळपासून उपोसथ सुरु होणार आहे. उपासिका, उपासकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शास्ता धम्म संस्कार संघातर्फे करण्यात आले.