चोपडा प्रतिनिधी । येथील ज्येष्ठ नागरिक संघ व कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार सेवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठांची आरोग्यविषयक कार्यशाळेचे नुकतेच आयोजित करण्यात आले होते.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी कबचौउम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील हे होते. कार्यशाळेचे उद्घाटन फेसकॉम महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष डी.टी.चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी बोलताना डी.टी.चौधरी यांनी सांगितले की, ज्येष्ठांनी आपले आरोग्य, धन, संपत्ती याविषयी जागरूक राहिले पाहिजे. तसेच मुले आणि नातवंडे यांची काळजी घेत आनंदी जीवन जगले पाहिजे. कुलगुरू डॉ. पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठांनी आरोग्यविषयक समस्यांबाबत जागरूक राहावे व वेळीच उपचार घ्यावे, असे सांगत समाजाप्रती निष्ठा ठेवून शक्य तेवढे योगदान द्यावे असे सुचवले. आरोग्यविषयक कार्यशाळेत चोपडा येथील डॉ. अमित हरताळकर यांनी ‘मधुमेह’ आजाराचे लक्षणे निदान व उपचार याविषयी तर हृदय रोग तज्ञ डॉ. दीपक पाटील यांनी ‘हृदयरोगाची लक्षणे निदान व उपचार’ याविषयी मार्गदर्शन केले. अस्थिरोग तज्ञ डॉ. सागर एस. पाटील यांनी ‘वृद्धापकाळात घ्यावयाची काळजी’ याविषयी तर योगशिक्षक योगेश चौधरी यांनी ‘योगा – आनंदी जीवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी क.ब.चौ.उमविच्या सिनेट सदस्य पुनम गुजराथी, डॉ.प्रा.अमूल बोरसे, खानदेश प्रादेशिक विभागचे अध्यक्ष सोमनाथ बागड (धुळे), सचिव बी.एन. पाटील (धुळे), डॉ.एस.आर.पाटील (रावेर), बी.आर.महाजन (शिर्डी), चौधरी (तांदळवाडी), सिताराम महाजन (वाघोदा), बाळकृष्ण वाणी (यावल), जे.जी.चौधरी (निमंत्रक फेस्कॉम धुळे), ॲड.धांडे (जळगाव) यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व्ही.एच.करोडपती यांनी तर उपस्थितांचे स्वागत संस्था संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.शाम गुजराथी यांनी तर सूत्रसंचालन सहसचिव एन.डी.महाजन यांनी व सुभाष पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिव प्रमोद डोंगरे, कोषाध्यक्ष सुभाष पाटील, भारंबे गुरुजी, दिलीप माधवराव पाटील व कार्यकारी सदस्यांनी परिश्रम घेतले