चाळीसगाव, प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांच्या चाळीसगाव शहरातील प्रचाराला आज मंगळवार दि. ८ रोजी सुरुवात शहराचे ग्रामदैवत आनंदा माता मंदिरात महाआरती ने करण्यात आली आहे. रॅलीचे उद्घाटन खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. रॅलीला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.
यावेळी खासदर उन्मेष पाटील यांनी आपल्या मनोगतात पक्षाला बळकटी देण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्ते पारदर्शकपणे आपले काम करीत आहे. त्याचे फळ निश्चितच जनताजनार्दन आपल्याला देईल यात कुठलीही शंका नाही असा विश्वास व्यक्त केला.मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, पक्षाच्या विचारांचे अनुकरण करत खासदार उन्मेष पाटील यांनी शहरासह विकासाचा जो नवा आयाम घालून दिला आहे तो त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे नेणार अशी ग्वाही देत असल्याचे सांगितले. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, माजी आमदार साहेबराव घोडे, तालुकाध्यक्ष के.बी. साळुंखे, जि. प. सभापती पोपट भोळे, नगराध्यक्ष आशालता विश्वास चव्हाण, योगाचार्य वसंतराव चंदात्रे बाबा, महिला आयोग सदस्या देवयानी ठाकरे, किसान आघाडी प्रदेश सरचिटणीस कैलास सूर्यवंशी, जेष्ठ नेते राजेंद्र चौधरी, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, पं. स. सभापती दिनेश बोरसे, उपसभापती संजय पाटील, मार्केट सभापती रविंद्र पाटील, भाजपा प्रदेश सदस्य यु. डी. माळी, अंबाजी ग्रुपचे चेअरमन चित्रसेन पाटील, पं. स. सदस्य पियूष साळुंखे, गटनेते संजूआबा राजपूत, नगरसेवक सोमसिंग राजपूत, बापू अहिरे, विजया भिकन पवार, चंद्रकांत तायडे, बाळासाहेब मोरे, चिरागोद्दीन शेख, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, अविनाश चौधरी, नमो राठोड, प्रेमचंद खिवसरा, तालुका सरचिटणीस प्रा. सुनील निकम, धनंजय मांडोळे, शहर सरचिटणीस प्रशांत पालवे व अमोल नानकर, सतीश पाटे, अलकनंदा भवर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, उपाध्यक्ष कपिल पाटील, प्रज्ञावंत आघाडीचे रमेश सोनवणे, युवा मोर्चा शहराध्यक्ष अक्षय मराठे, किशोर पाटील ढोमनेकर, दिनकर राठोड, किशोर गवळी, इमरान शेख, विवेक चौधरी, राजू पगार, अरुण पाटील, योगेश खंडेलवाल, राजू मांडे, सुबोध वाघमारे, विजय जाधव, रणजित देशमुख, पप्पू राजपूत, बंडू पगार, कैलास गावडे, भरत गोरे व सर्व आजी माजी नगरसेवक जिल्हा परिषद सभापती, सदस्य, पंचायत समिती सभापती, सदस्य सरपंच उपसरपंच सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात रॅलीस बाजारपेठेतून सुरुवात होऊन रांजणगाव दरवाजा, अफू गल्ली, रथ गल्ली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, रिंग रोड, शिवाजी राजे घाट, गांधी चौक, बागवान गल्ली, पाटील वाडा, टिळक चौक, दत्तवाडी येथे या प्रचाराला समारोप करण्यात आला. रॅली दरम्यान मंगेश चव्हाण यांचे ठिकठिकाणी औक्षण करून विजय तिलक लावण्यात आले.