जळगाव, प्रतिनिधी । येत्या 8 ऑक्टोंबर, 2019 रोजी मेहरुण तलाव, शिरसोली रोड, जळगाव येथे रावन दहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रावण दहन कार्यक्रमाकरीता जळगाव शहरातील व परिसरातील नागरीक मोठ्या प्रमाणात सहभागी होत असल्याने गर्दी होते. त्याअनुषंगाने जळगाव शहरातील वाहतुक मार्गामध्ये बदल करण्याबाबतचे आदेश डॉ. पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी काढले आहे.
त्यानुसार मुंबई पेालीस कायदानुसार जळगाव शहरातील खालील ठिकाणी सर्व प्रकारच्या वाहनांच्या मार्गामध्ये बदल करण्यात येत आहे. जळगाव शहरात 8 ऑक्टोबर, 2019 रोजी दुपारी 15 वाजेपासून ते रात्री 22 वाजेपावेतो मोहाडी रोड वाय पॉईट पासुन ते ग्राफीक्स हॉटेल जवळ शिरसोली रोडवरील ग्राफीक्स हॉटेल हाजी मलंग बाबा दर्गा पावेतो इतर सर्व प्रकारच्या वाहनांना (अत्यावश्यक सेवा वगळुन ) वरील कालावधीत जाण्यास व येण्यास प्रवेश बंद होणार आहे.
प्रवेश बंद करण्यात आलेल्या मार्गाऐवजी नागरिकांनी हाजी मलंग दर्गा जवळून डावीकडे वळून मोहाडी रोडने उजवीकडे वळून पुढे छत्रपती संभाजी महाराज चौकातून उजवीकडे वळून कोल्हे हिल्सकडे जाणाऱ्या रस्त्याने जावून संत गाडगेबाबा चौकातून उजवीकडे वळून महाबळ, काव्य रत्नावली चौक, आकाशवाणी चौक या मार्गाचा वापर नागरिकांनी करावा. तसेच ईच्छादेवी चौक, आकाशवाणी चौकाकडून शिरसोली कडे जाणाऱ्या वाहनांना मेहरुणकडे जाणारा मार्ग बंद करण्यात येत असून त्याऐवजी वाहनचालकांनी आकाशवाणी, काव्यरत्नावली चौकातून पुढे महाबळ, संत गाडगेबाब चौक, छत्रपती संभाजी चौक, हाजी मलंग दर्गा व पुढे शिरसोली रोड या पर्यायी मार्गाचा वापर करावा. असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी नागरिकांना केले आहे.