Home Cities जळगाव जळगावात ऑईल मीलला भीषण आग

जळगावात ऑईल मीलला भीषण आग

0
32

jagwani oil mill fire

जळगाव प्रतिनिधी । येथील जगवाणी ऑईल मीलला लागलेल्या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, येथील औद्योगिक वसाहतमधील बी सेक्टरमध्ये असणार्‍या जगवाणी ऑईल मीलला रात्री साडेअकराच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीचे नेमके कारण लक्षात आले नाही. तथापि, प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्कीटमुळे ठिणगी पडून आग लागल्याचे समजते. यात मीलमधील कच्चा माल जळून खाक झाला. अग्निशमन दलाने अथक प्रयत्न करून रात्री एकच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले.


Protected Content

Play sound