जळगाव प्रतिनिधी। राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली असून यात भुसावळ वगळता जिल्ह्यातील सात जागांचा समावेश आहे. जाणून घ्या कुणाला मिळाली उमेदवारी.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेने पहिली यादी जाहीर केली असली तरी अद्यापही राष्ट्रवादीने यादी जाहीर केली नव्हती. या पार्श्वभूमिवर, पक्षाने आज आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात जळगाव जिल्ह्यातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. यात पारोळ्यातून आ. डॉ. सतीश पाटील; चाळीसगावमधून माजी आमदार राजीव देशमुख; पाचोर्यातून माजी आमदार दिलीप वाघ; जळगाव ग्रामीणमधून पुष्पा ज्ञानेश्वर महाजन; जामनेरमधून संजय गरूड, अमळनेरमधून अनिल भाईदास पाटील तर चोपड्यातून माजी आमदार जगदीश वळवी यांचा समावेश आहे. भुसावळची जागा मात्र जाहीर करण्यात आलेली नाही. यामुळे येथून नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे.