आठवलेंना सहा जागा ; चार उमेदवारांची रिपाइंकडून घोषणा

ramdas athawale

 

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना-भाजप महायुतीतील रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला ६ जागा सोडण्यात आल्या आहेत. त्यापैकी चार जागांवरील उमेदवारांची आज आठवलेंनी घोषणा केली आहे.

 

रामदास आठवले यांनी मानखुर्दमधून गौतम सोनावणे, फलटणमधून दीपक निकाळजे. पाथरी मोहन फड आणि नायगावमधून राजेश पवार लढणार आहेत. दरम्यान, आठवलेंचे हे सहाही उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रामदास आठवले यांनी महायुतीकडे दहा जागांची मागणी केली होती. मात्र त्यांना केवळ सहाच जागा देण्यात आल्या आहेत.

Protected Content