Home Cities जळगाव आ. भोळे यांनी घेतली माजी महापौर लढ्ढा यांची भेट

आ. भोळे यांनी घेतली माजी महापौर लढ्ढा यांची भेट

0
57


WhatsApp Image 2019 10 02 at 1.51.06 PM

जळगाव, प्रतिनिधी | शहराचे आमदार राजूमामा भोळे यांना पुन्हा भाजपने उमेदवारी दिली आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर आ. भोळे यांनी महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांंशी भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.

महायुतीची उमेदवारी जाहीर होताच आमदार राजुमामा भोळे यांनी महापालिकेतील शिवसेनेचे माजी महापौर व नगरसेवक नितीन लढ्ढा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली व निवडणूकीबाबत चर्चा केली. यावेळी श्री. लढ्ढा यांनी आ. भोळे यांना मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा नगरसेवक विशाल त्रिपाठी व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound