Home Cities जळगाव शिवसेनेचे एबी फॉर्म युती झाल्याशिवाय फायनल नाहीत : ना. गुलाबराव पाटील

शिवसेनेचे एबी फॉर्म युती झाल्याशिवाय फायनल नाहीत : ना. गुलाबराव पाटील

0
30

Gulabrao patil

जळगाव, प्रतिनिधी | सेनेने काही ठिकाणी युती घोषित होण्या अगोदरच जिल्ह्यात उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याबद्दल राज्याचे सहकार मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारल्यावर ते म्हणाले की, जिल्ह्यात जे सिटिंग आमदार आहेत त्यांनाच शिवसेनेने एबी फॉर्म दिले असून युती झाल्याशिवाय हे फायनल होऊ शकत नाही असे यावेळी ते म्हणाले.

शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्याच्या घटनेवर बोलतांना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, ईडीने चौकशीला सुरवात केली असून जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल. पण जे निर्दोष आहे त्यांना घाबरण्याची काही मात्र त्यांनी जर चूक केली असेल त्यांना शिक्षा भोगावी लागणार आहे. मात्र राजकारणाचा विचार केला तर त्यांचे काम चांगले आहेत अस म्हणत पाटील यांनी अजित पवार आणि शरद पवार यांची पाठराखण केली आहे.


Protected Content

Play sound