Home Cities चाळीसगाव टाकळी प्र.चा. उपसरपंचपदी वर्षा पाटील बिनविरोध

टाकळी प्र.चा. उपसरपंचपदी वर्षा पाटील बिनविरोध

0
127


takali patil

चाळीसगाव प्रतिनिधी । टाकळी (प्र.चा.) ग्रामपंचायत उपसरपंचपदी वर्षा पाटील यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, याप्रसंगी वर्षा पाटील यांनी टाकळी प्र.चा. गावाचा पायाभुत व सर्व स्थरातील विकास करण्याचा संकल्प केला. नवनियुक्त उपसरपंच वर्षा निलेश पाटील यांचे सतिष महाजन, प्रदिप पाटील, विजय पवार, निलेश पाटील, विवेक चौधरी, अशोक पाटील तसेच मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. परिवर्तन पॅनल प्रमुख पंडीत स्वार, जगन्नाथ महाजन, रघुनाथ गुजर तसेच सरपंच युवराज पवार, संदिप स्वार चंद्रकांत महाजन, प्रमिला पवार, कविता महाजन, उज्ज्वला पाटील, प्रल्हाद महाजन, शाम गवळी, ग्रामविस्तार अधिकारी सुभाष सूर्यवंशी, तलाठी कणके यांनी या निवडीसाठी मोलाचे सहकार्य केले.


Protected Content

Play sound