धक्कादायक : खारघरमध्ये तरुणाकडून कुत्रीवर बलात्कार

download 1 4

खारघर (वृत्तसंस्था) नवी मुंबईतील खारघरमध्ये एका भटक्या कुत्रीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्राणी मित्रांच्या तक्रारी नंतर संबंधित तरुणाला अटक करण्यात आली आहे.

 

अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका कुत्रीवर बलात्कार करून तिला ओरल सेक्ससाठी भाग पाडणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. या तरूणाची ओळख पटली असून २० वर्षीय तरूणाचे नाव मुनमुन कुमार गुवोधन राम असे आहे. आरोपी एका फूड आऊटलेटमध्ये कामाला आहे, आरोपीला अटक केल्यानंतर गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात आले, त्याची रवानगी २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली.

 

या संदर्भात तक्रार दिलेल्या विजय रंगारे यांनी सांगितले की, १५ ऑगस्टला मुनमुन कुमार गुवोधन या आरोपीने हे घृणास्पद कृत्य केले. रंगारे हे प्राणीमित्र कार्यकर्ते असून त्यांना ही घटना एका विद्यार्थ्यांच्या ग्रुपने लक्षात आणून दिली. ते खारघरच्या सेक्टर ४ मध्ये आपल्या मित्राला भेटायला गेले होते. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने भटक्या कुत्रीवर बलात्कार केला आणि तिला ओरल सेक्स करण्यासाठी भाग पाडत होता.

Protected Content