पारोळा, प्रतिनिधी | तालुक्यातील नागरिकांना नवीन आधार कार्ड किवा जुने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी असलेले सुविधा केंद्र बंद झाल्याने भटकंती करावी लागत आहे.
पारोळा हा जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्याला लागून सर्वात जास्त खेडे आहेत. यार्वाना विविध शासकीय कामांंसाठी आधार कार्ड लागत असल्याने तालुक्यातील शेतकरी, हात मजूर, व्यापारी नोकरी वर्ग यांना आधार कार्ड बनविण्यासाठी व अपडेट करण्यासाठी असलेले आधार सुविधा केंद्र देखील बंद पडल्याने त्रासाला सामोरे जावे लागत आहे. केवळ पोस्ट ऑफिसमध्ये आधार कार्ड संबधित कामकाज केले जात आहे. तालुक्यामध्ये एकूण ११४ खेडे आहेत. पारोळा शहरात ३ ते ४ आधार कार्ड सुविधा केंद्र सुरु होते. परंतु ऑपरेटर ब्लॅक लिस्ट झाल्यामुळे बंद ती झाली आहेत. काही नागरिकांना आधार कार्ड काढून ५ वर्ष झालेले असल्यामुळे त्यांना अपडेट करणे गरजेचे असते. ही आधार सुविधा केंद्र बंद झाल्याने नागरिकांना पारोळा तालुक्यात आधार कार्डसाठी वणवण फिरावे लागत आहे. पारोळा तालुक्यातील पोस्ट ऑफिसमध्ये आधार कार्ड बनवण्याची सुविधा सुरू आहे. पण त्याठिकाणी नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे त्याठिकाणी रोज फक्त दोन आधार कार्ड अपडेट केले जातात असे पोस्ट ऑफिस मधील कर्मचाऱ्याने सांगितले. आज पोस्ट ऑफिसमध्ये आधार कार्ड अपडेटसाठी व काढण्यासाठी नोंदणी ५०० ते ६०० नागरिकांची प्रतीक्षेत आहेत. तालुक्यातील नागरिकांची आधार कार्ड संबधित होणाऱ्या गैरसोयीकडे लक्ष न दिल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. पारोळा तहसीलदार ए.बी.गवांदे यांनी नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीकडे लक्ष देऊन होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे.