पहुर ता. जामनेर, प्रतिनिधी | येथील राष्ट्रवादी काँग्रेस शाखेतर्फे पहूर बंदचे आज आवाहन करण्यात आले. सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत येथील व्यापाऱ्यांनी आपले दुकाने प्रतिष्ठाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग घेतला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने गुन्हा दाखल केला आहे. या निषेधार्थ येथील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज सकाळी ११ वाजेपर्यंत बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. यावेळी माजी सरपंच प्रदीप लोढा, उपसरपंच श्याम सावळे, भास्कर पाटील, अशोक देशमुख, शैलेश पाटील, विवेक जाधव, किरण पाटील, ज्ञानदेव करवंदे, तौफिक तडवी, मिनाज भाई, सलीम शहा, वसीम शेख, राजू जेंटलमॅन, राजू पाटील, ईश्वर बारी, शांताराम पाटील, सचिन देशमुख, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.