चाळीसगाव प्रतिनिधी । संपूर्ण जगात आपल्या आरोग्यासाठी डॉक्टरांना देवदूत संबोधले जाते. परंतु डॉक्टरांच्या सोबत अविरतपणे जनतेला सेवा देत फार्मसिस्ट सुद्धा आरोग्यासाठी पडद्यामागील देवदूताची भूमिका पार पाडत असतात, असे प्रतिपादन मंगेश चव्हाण यांनी फार्मसिस्ट दिनानिमित्त आयोजित फार्मसिस्ट स्नेह संमेलनात केले.
यावेळी व्यासपीठावर केमिस्ट असोसिएशन तालुका अध्यक्ष योगेश भोकरे, सेक्रेटरी प्रेमसिंग राजपूत, सदस्य प्रदीपदादा देशमुख, राजेंद्र पाटील, संदीप भेदमुथा, चंद्रकांतआबा पाखले तसेच केमिस्ट असोसिएशन चाळीसगावचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि तालुक्यातील सर्व औषधीविक्रेते बंधु भगिनी उपस्थित होते.
यावेळी फार्मसिस्ट बंधू भगिनींना सन्मानित करण्यात आले. पुढे मंगेश चव्हाण म्हणाले की, गोरगरिबांसाठी आपण बऱ्याचदा डॉक्टरांची भूमिका पार पाडत असतात. आपण अविरतपणे देत असलेल्या कार्याचा गौरव करावा तितका कमीच आहे. त्यामुळे आपल्या कार्याला वंदन करतो व आपल्या हातून यापुढे अशीच सेवा जनसामान्यांना मिळत राहो हीच अपेक्षा ठेवतो असे मनोगत उपस्थित फार्मसिस्ट बंधू भगिनींसमोर व्यक्त केले. व्यासपीठावरील योगेश भोकरे, संदीप बेदमूथा,राजेंद्र पाटील, प्रेमसिंग राजपूत यांनी मनोगत व्यक्त केले. त्यावेळी त्यांनी मंगेश चव्हाण यांनी केलेल्या तालुक्यातील विविध कामांचे कौतुक केले.
जितू वाघ यांनी प्रास्ताविकात मंगेश चव्हाण मित्र परिवाराने केलेल्या कार्याची माहिती उपस्थीतांना दिली तर योगेश खंडेलवाल यांनी आभार मानले.