चोपडा प्रतिनिधी । ऑल इंडिया जैन जर्नालिस्ट असोसिएशन म्हणजेच आईजाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी चोपडा येथील लाईव्ह ट्रेंडस् न्यूजचे प्रतिनिधी लतीश जैन यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष हार्दिक हुंडीया यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच ऑल इंडिया जैन जर्नालिस्ट असोसिएशनचे प्रथम राष्ट्रीय महासंमेलन मुंबईतल्या विरार येथे मोठ्या उत्साहात पार पडले. यात भरीव काम करणार्यांचा गौरव करण्यात आली. याप्रसंगी विविध पदांची निवडदेखील करण्यात आली. ऑल इंडिया जैन जर्नालिस्ट असोसिएशन ही संघटना जैन समाज उद्धारासाठी, जैन साधु संताच्या देखभालीसाठी, आणि विविध समाजपोयोगीं कामे, सामाजिक काम, जनजागृती करण्यासाठी अश्या विविध कामासाठी ही संघटना स्थापन करण्यात आली आहे. यात जे काम करण्यासाठी सक्षम आणि आवड असणार्याची विशेष पदावर नियुक्ती होत असल्याचे हार्दिक हुंडीया व दिलीप कावेरीया यांनी बोलताना सांगितले. या कार्यक्रमात प्रदेश उपाध्यक्ष पदावर चोपडा येथील लतीश भवरलाल जैन ,तर औरंगाबाद निवासी महेंद्र संकलेचा यांची सचिवपदी तर पूना निवासी मोहन बागमार याची कोष्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. ही निवड आईजाचे राष्ट्रीय अध्यक्ष हार्दिक हुंडीया , महामंत्री महावीर श्रीश्रीमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश अध्यक्ष दिलीप कावेरीया यांनी केली. लतीश जैन यांनी यापूर्वीही अनेक संघटनाचा पदावर काम केले आहे. आता त्यांना आईजासारख्या संघटनेत महत्वाच्या पदावर काम करायला मिळणार असून याबद्दल त्यांचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.



