पारोळा, प्रतिनिधी | तालुक्यातील टिटवी येथे तरुण हा शेतातील विहिरीत पाय घसरून तोल गेल्याने विहिरीत पडून त्याचा मृत्यु ओढवला.
राजेंद्र धनराज सोनवणे (वय १९, रा. टिटवी तालुका पारोळा) हा शेतातील काम झाल्यावर विहिरीवर हातपाय धुण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याचा पाय घसरून तोल गेल्याने तो विहिरीत पडला. त्यास तेथील लोकांच्या मदतीने बाहेर काढून खाजगी वाहनाने उपचारासाठी कुटीर रुग्णालय पारोळा येथे दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले. युवराज पोलाद सोनवणे यांच्या माहितीवरून पारोळा पोलीस स्टेशन येथे भादवि कलम १७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली कैलास शिंदे करीत आहे.