Home राज्य हंसराज अहीर यांच्या सुरक्षा वाहनाचा अपघात ; २ ठार, ३ जखमी

हंसराज अहीर यांच्या सुरक्षा वाहनाचा अपघात ; २ ठार, ३ जखमी

0
24

hansraj ahir

 

 

नागपूर प्रतिनिधी । वर्धा जिल्ह्यातील कांडळीजवळ आज सकाळी ८.३० च्या सुमारास माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाचा अपघात झाला आहे. या अपघात दोन जागीच ठार, तीन गंभीर जखमी झाले आणि हंसराज अहीर हे थोडक्यात बचावले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, हंसराज अहीर हे चंद्रपूरहून नागपूरला जात होते. वर्ध्यातील जाम चौरस्त्याजवळ कांडळी नदी पार केल्यानंतर हा अपघात झाला. सुरक्षा वाहन चालक गंभीर जखमी असल्याचे समजते आहे.


Protected Content

Play sound