Home Cities जळगाव रावेरातून विवेक ठाकरे यांना ‘एमआयएम’ची उमेदवारी जाहीर

रावेरातून विवेक ठाकरे यांना ‘एमआयएम’ची उमेदवारी जाहीर

0
39


VIVEK THAKARE

जळगाव, प्रतिनिधी | जिल्ह्यातील रावेर-यावल मतदार संघातून एमआयएमतर्फे विवेक ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आल्याचे आज (दि.२५) जाहीर करण्यात आले आहे. एमआयएमने आज आपली चौथी उमेदवार यादी जाहीर केली असून त्यामध्ये ठाकरे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे.

 

एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज त्यांच्या नावाची घोषणा केली. आज जाहीर करण्यात आलेल्या चौथ्या यादीत एकूण तीन जणांची नावे असून त्यात धुळे येथून मोहम्मद युसुफ अब्दुल हमीद मुल्ला व जालना येथून इक्बाल अहमद खान (पाशा) या दोघांचा समावेश आहे.


Protected Content

Play sound