पारोळा, प्रतिनिधी | मंगरूळ येथील रहिवासी बाळू सुकलाल पाटील यांच्या मालकीची चारचाकी गाडी (एमएच-१९-एएक्स-३२६०) चोरट्यांनी मंगरूळ येथील घरासमोरून चोरून नेली. ही घटना २१ रोजी रात्री घडली.
बाळू पाटील त्यांची चारचाकी गाडी घरासमोर न दिसल्याने त्यांनी सकाळी गाडीची शोधाशोध केली मात्र त्यांना गाडी दिसून आली नाही. याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला खबर दिली असता तपासासाठी कॉन्स्टेबल वानखेडे यांनी घटनास्थळी येऊन चौकशी केली. जवळच्या सीसीटीव्ही कॅमे-यात पाहिले असता चोरटे कासोदा-पारोळा रस्त्याने धुळ्याकडे पसार झाल्याचे समजले. पारोळा पोलीस प्रशासनाकडून एकही चोरीचा तपास लागलेला नाही. चार महिन्यांमध्ये भरपूर ठिकाणी मोठ-मोठ्या चोऱ्या झालेल्या आहे. या प्रकरणी बाळू पाटील यांनी पारोळा पोलिसात गुन्हा नोंदविला आहे. तपास विजय भोई करीत आहेत.