Home Cities भुसावळ भुसावळात वाढीव टँकरद्वारे होणार पाणी पुरवठा

भुसावळात वाढीव टँकरद्वारे होणार पाणी पुरवठा

0
51


भुसावळ प्रतिनिधी । शहरात आता टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा होणार असून यासाठी नगरपालिकेतर्फे १० टँकर्सची खरेदी केली जाणार आहे.

येथील पालिकेच्या सभागृहात गुरूवारी सकाळी ११ वाजता सर्वसाधारण सभा झाली. विषय पत्रिकेवरील ३२ विषयांचे वाचन करून सर्वच विषयांना मंजुरी देण्यात आली. सर्व विषय विकासात्मक असल्याने नगरसेवकांनी एकमताने आवाजी मंजुरी दिली. आगामी उन्हाळ्यात हा प्रश्‍न आणखी बिकट होणार आहे. यात पाच टँकरची सेवा अपुरी असल्याने वाढीव १० टँकर खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिली. सर्वच विषयांना मंजुरी देत पालिकेची बैठक लवकरच आटोपली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound