धरणगाव (प्रतिनिधी) संगमनेर येथे झालेल्या बैठकीत पक्षश्रेष्ठींकडून युवक कॉंग्रेसचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष चंदन पाटील यांना खुद्द प्रदेशध्यांनी कामाला लागण्याचे आदेश दिले आहे.
संगमनेर येथे झालेल्या बैठकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली असून आहे. परंतू तरी देखील जळगाव ग्रामीणची जागा काँग्रेसला सोडावी, अशी मागणी जळगाव ग्रामीणच्या काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, जळगाव ग्रामीण ची जागा विधानसभेचे युवक काँग्रेसला सोडण्यासाठी जोरात प्रयत्न सुरू असल्याचे संगीतले. या बैठकीत इच्छुक उमेदवार म्हणून म्हणून चंदन पाटील यांनी उमेदवारी लढवण्यास होकार दिला. तरुण मराठा उमेदवार म्हणून चंदन पाटील हे शिवसेने समोर चांगले आव्हान उभे करू शकतात,असे त्यांच्या समर्थकांनी यावेळी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना सांगितले. दरम्यान, आमची राज्यात आघाडी झाली आहे. परंतू जळगाव ग्रामीणची जागा कॉंग्रेसला सुटल्यास आपण निवडणूक लढण्यास तयार आहोत. आघाडी न झाल्यास आघाडी धर्म आम्ही प्रामाणिकपणे पाळू, अशी प्रतिक्रिया चंदन पाटील यांनी ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलतांना दिली आहे.