Home Cities अमळनेर अमळनेर तालुक्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन ठार ; चौघे जखमी

अमळनेर तालुक्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन ठार ; चौघे जखमी

0
59


amalner photo

अमळनेर, प्रतिनिधी | तालुक्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये आज (दि.१७) तीन जण मृत्युमुखी पडले असून चार जण जखमी झाले आहेत.

अधिक माहिती अशी की, बोरी नदी पात्रात आज दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच पारोळा रस्त्यावर काही वाहनांच्या विचित्र अपघातात एक बालक जागीच ठार झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. याशिवाय ढेकू रोडवर लोंबकळणा-या तारांमुळे शॉट सर्किट होऊन एक जण
६० टक्के भाजला आहे. तसेच २० मीटर स्फोट होऊन जळाल्याची घटनाही घडली आहे.

तामसवाडी धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने बोरी नदी दुथडी भरून वाहत आहे. येथील दानिश शेख अरमान (वय १६) व शाहीदखा रेहमानखा (वय १६) रा.कसली मोहल्ला हे दोघे स्मशानभूमीत विटा पोहचवायला गेले असता पाण्यात बुडून मरण पावले. पारोळा रस्त्यावर मोटरसायकलला चारचाकीने धडक दिल्याने अमोल इरा पावरा हाबालक जागीच ठार झाला असून रेखा पवार व जनाबाई पावरा या जखमी झाल्या आहेत. तसेच ढेकू रोडवर शॉट सर्किटमळे दिनेश परशुराम भिल या तरुणाला शॉक लागून तो ६० टक्के भाजला आहे तर याच भागात २० मीटर बॉक्स स्फोट होऊन फुटले आहेत.


Protected Content

Play sound