Home धर्म-समाज मुख्याध्यापिका रेखा वैद्य यांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान

मुख्याध्यापिका रेखा वैद्य यांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान

0
120

jal 1

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील मुंजलवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील ग्रेडेड मुख्याध्यापिका रेखा वैद्य यांना आज जिल्हा परिषदेच्या वतीने ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, जळगावातील सरदार पटेल सभागृहात या कार्यक्रम घेण्यात आला असून अध्यक्षस्थानी खासदार रक्षा खडसे होत्या. रेखा वैद्य यांनी आपल्या 35 वर्षांच्या सेवेत रावेर, मुक्ताईनगर तालुक्यात शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून सेवा दिली. जळगावच्या सरदार पटेल सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रक्षा खडसे होत्या. खासदार उन्मेष पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, शिक्षण सभापती पोपट भोळे यांच्यासह सर्व शिक्षणाधिकारी यावेळी उपस्थित होते.


Protected Content

Play sound