जळगाव, प्रतिनिधी | आज रविवार दि १४ सप्टेंबर रोजी जिल्हा व अंतर्गत सर्व न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये विविध १२७० खटले निकाली निघाले असून हा उपक्रम यशस्वी ठरला आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , जिल्हा वकील संघ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकअदालतीचे आज जिल्हयात सुरूवातीला राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांचे संकल्प गीत वाजवण्यात येऊन लोकअदालतीची सुरूवात करण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.ए. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षकार त्याच प्रमाणे शासनाचे विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवाहन करून या लोकअदालतीमध्ये प्रकरणे ठेवण्यात आली. लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली ४०८ इतकी प्रकरणे आणि वादपुर्व प्रकरणांपैकी ८६२ इतकी प्रकरणे निकाली झाली आहेत. जलद आणि सोप्या पध्दतीने न्याय मिळावा या संकल्पनेतून या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकुण १२७० इतकी प्रकरणे ही तडजोडीव्दारे निकाली निघाली. एकुण रू. ८९९३७६७४ रक्कमेची प्रकरणे तडजोडीव्दारे निकाली .
…आणि पती-पत्नी एकत्र नांदावयास झाले तयार
या लोक अदालतीची विशेष विशीष्ट म्हणजे एका जोडप्यात वाद होते. पतीने विधी सेवा प्राधिकरणाकडे वादपुर्व मध्यस्थी प्रकरण दाखल केले. या वादपूर्व प्रकरणामध्ये गैर अर्जदार पत्नीस नोटीस देण्यात आली. या प्रक्रियेमध्ये पती व पत्नीकडील दोन्ही कुटूंब हजर होते. दोन्ही कुटूंबामध्ये विशेष:ता पती पत्नीमध्ये वादपूर्व मध्यस्थीव्दारे प्रशिक्षीत मध्यस्थीव्दारे मध्यस्थी घडवून आणली. त्यानंतर अंतीम तडजोडीसाठी प्रकरण राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आले. आज या प्रकरणास हुकुमनामा पारीत करण्यात आला. प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून दाम्पत्य वेगळे राहत होते. या प्रक्रियेव्दारे दोन्ही पक्षात समझोता होवून पत्नी पत्नी नांदावयास सोबत गेले. सदरचे प्रकरण हे जळगाव येथील पहिलेच तडजोड झालेले प्रकरण आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश के.एच. ठोंबरे, जिल्हा सरकारी वकील ॲड. केतन ढाके तसेच वकील संघाचे अध्यक्ष ॲड. पी.बी.चौधरी ,जळगाव विधीज्ञ ,कर्मचारी व पक्षकार मोठया संख्येने उपस्थित होते.