Home Cities चोपडा नगररचना अधिकारी म्हणून मृणालिनी पाटील यांची नियुक्ती

नगररचना अधिकारी म्हणून मृणालिनी पाटील यांची नियुक्ती

0
105

patil

चोपडा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत चोपडा शहरातील विद्याविहार कॉलनीतील रहिवासी कु. मृणालिनी पाटील यांची नगररचना अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मध्यमवर्गीय घरातील मृणालिनी पाटील यांनी आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अभ्यास करून हे यश मिळवले आहे. जिल्हा बँकेचे कर्मचारी विजय सांळुखे, प्राथमिक शिक्षिका चित्रा पाटील यांची ती कन्या असून जळगाव ग.स.सोयायटी माजी चेअरमन कै. अमृतराव फकीरा पाटील यांची ती नात आहे. या निवडीनंतर लवकरच ती प्रशिक्षणाला जाणार आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.


Protected Content

Play sound