आशियायी योगासन स्पर्धेत डॉ.अनिता पाटील यांचा अंतरराष्ट्रीय पंच म्हणून गौरव (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 09 14 at 3.19.37 PM

 

जळगाव, प्रतिनिधी | योग फेडरेशन ऑफ इंडिया व एशियन योग फेडरेशनव्दारा दक्षिणकोरियात येसू येथे कोरियन योग फेडरेशन ने आयोजित केलेल्या ९ व्या एशियन योगा स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चॅम्पियनशिप जिंकली. भारताकडून प्रत्येक वयोगटातील ४२  स्पर्धकांनी भाग घेतला होता तर महाराष्ट्रातील ७ खेळाडूंचा सहभाग होता. जळगाव येथील डॉ. अनिता पाटील यांनी या स्पर्धेत  भारताकडून योग पंच म्हणून कार्य पाहिले.  त्यांना आशियायी योगासन स्पर्धेत अंतरराष्ट्रीय पंच म्हणून गौरविण्यात आले.

या स्पर्धेत श्रावणी पाचखेडे हिने १४ ते १७ वयोगटात ॲथेलेटीक योग प्रकारात रजत तर रिदमिक योग प्रकारात कास्यपदक पटकविले आहे. ती डॉ. अनिता पाटील यांची विद्यार्थिनी आहे. तनवी रेड्डीज, श्रावणी पाचखेडे , श्रेया कंधारे , श्रद्धा मुंदडा लडढा, धनश्री लेकूरवाळे, कविता गाडगीळ, चंद्रकांत पांगारे या सर्व खेळाडूंची विविध वयोगटात महाराष्ट्र योग असोसिएशनचे राज्यस्तरीय स्पर्धेतून निवड झाली. योग फेडरेशन ऑफइंडियाच्या राष्ट्रीय स्पर्धेतुन निवड झालेले व तेथून ९ व्या एशियन योग स्पर्धेत प्रतिनिधीत्व केलेल्या स्पर्धेचा कॅम्प पंचकुला हरियाणा किसान भवन येथे आयोजित करण्यात आला होता. त्या कॅम्पला भारतीय संघाला डॉ. अनिता पाटील, अमन मॅडम, इंदू अग्रवाल,अशोककुमार अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत, श्रद्धा लढ्ढा हीने २१ ते २५ गटात ॲथेलेटीक योग व फ्री फ्लो डान्स योग दोन गटात सुवर्णपदक पटकविले. तर आर्टिस्टीक योगा, रिदमिक योगा,आर्टिस्टीक सोलो योगा या प्रकारात तीने रजत पदक प्राप्त केले आहे. डॉ. अनिता पाटील यांची मुलगी आंतरराष्ट्रीय योगपटु श्रध्दा पाटील सध्या फिलिपीन्समध्ये शिक्षण घेत आहे. व  धुळयाची आंतरराष्ट्रीय योग पटु योगेश्वरी मिस्तरी व आता श्रावणी पाचखेडे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय योगपटु बनण्याचे ध्येय व जिद्द ठेऊन सराव करीत असतात.  असे अनेक खेळाडू जळगावमध्ये डॉ. पाटील यांच्याकडे विनामूल्य प्रशिक्षण घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी झालेत.  जळगावच्या मास्टर तनय मल्हार या विद्दयार्थ्याने डान्स प्लस या कर्यक्रमात रीदमिक योगाचे सुंदर प्रदर्शन सादर करून योगाला जागतिक स्तरावर विशेष डान्स व योगाचे फ्युजन सादर करून एक नवा आयाम मिळवून देत खानदेशच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आणि तेव्हापासून डान्स व योगा यांचे आकर्षण वाढले असल्याचेही डॉ. पाटील यांनी सांगितले.  महाराष्ट्र योग असोसीएशनचे अध्यक्ष परमानंद महाराज व जळगाव हौशी योग असोसीएशनचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी भारतीय संघाचे विजेते व डॉ. अनिता सतिश पाटील यांचे महाराष्ट्रातील महिला अतरराष्ट्रीय योगपंच, योगमार्गदर्शक व योगतज्ञ अभिनंदन केले.

Protected Content