जळगाव प्रतिनिधी । दुचाकीवरून कामाला जात असलेल्या तरूणांची दुचाकी घसरून अपघात झाल्याची घटना आज सकाळी रावेर तालुक्यातील खिरोदा गावाजवळ घडली. जखमी झालेल्या तिघा तरूणांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले आहे.
याबाबत माहिती आशी की, दीपक बारेला, सुनील बारेला, श्रीराम बारेला तिघे रा. शिरवेल, मध्यप्रदेश असे जखमी झालेल्या तीन तरूणांची नावे आहेत. दीपक, सुनील आणि श्रीराम हे तिघे चुलत भाऊ शुक्रवारी पहाटे कामासाठी दुचाकीने निघाले होते. मात्र, रावेर तालुक्यातील खिरोदा गावाजवळून जात असताना अचानक दुचाकी घसरली आणि दुचाकीवरून तिघेही फेकले गेले. यात तिघांच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. तिघांना त्वरित जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.