Home Cities यावल यावल तालुक्यात निराधार योजनेच्या दोनशेच्या वर प्रकरणांना मंजुरी

यावल तालुक्यात निराधार योजनेच्या दोनशेच्या वर प्रकरणांना मंजुरी

0
28

यावल प्रतिनिधी । येथील तहसील कार्यालयात आज संजय गांधी निराधार समितीची बैठक होऊन यात यात तालुक्यातील विविध लाभार्थ्यांची प्रकरण मंजुर करण्यात आली.

यावल येथील तहसील कार्यालयात तहसीलदार जितेन्द्र कुवर, निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार, संजय गांधी निराधार समितीचे तालुका अध्यक्ष विलास सदाशिव चौधरी, समिती सदस्य संजय एकनाथ भालेराव, सौ. शितल रविन्द्र पाटील, तुषार सांडुसिंग पाटील, प्रभाकर कडु बेंडाळे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत विधिध योजनांची एकुण २७१ प्रकरणे ठेवण्यात आली होती यातुन संजय गांधी निराधारचे८१ प्रकरण, इंदीरा गांधी भुमिहीनची ७० प्रकरण तर श्रावणबाळ या योजनेचे ७५ प्रकरणे अशी २२६लाभार्थ्यांच्या प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. या समितीच्या बैठकीस संजय गांधी निराधार समितीचे कार्यालयीन अव्वल कारकुन रविन्द्र मिस्त्री यांच्यासह कार्यालयीन कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.


Protected Content

Play sound