Home Cities धरणगाव दुथडी वाहणार्‍या अंजनी नदीचे जलपूजन

दुथडी वाहणार्‍या अंजनी नदीचे जलपूजन

0
97

anjani jalpujan
धरणगाव प्रतिनिधी । अनेक वर्षानंतर प्रथमच दुथडी भरून वाहणार्‍या अंजनी नदीचे जलपूजन अहिरे बुद्रुक येथील ग्रामस्थांनी केले.

सध्या होत असणार्‍या जोरदार जलवृष्टीमुळे सर्व नदी-नाले भरून वाहू लागले आहेत. यात अंजनी नदी पात्रदेखील खळाळले आहे. अनेक वर्षानंतर अंजनी नदी वाहत असल्याने परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, अहिरे बुद्रुक येथील ग्रामस्थांनी अंजनीचे जलपूजन केले. याप्रसंगी नदीला साडी-सोळीचा आहेर अर्पण करून वंदन करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच पवन पाटील. विजय पाटील, भीमराव मायचे, राकेश पाटील, अमोल पाटील, कृष्णा पाटील, विठ्ठल पाटील, जयेश पाटील यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound