नवी मुंबई प्रतिनिधी । भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नुकतीच रवी शास्त्री यांची फेरनियुक्ती झाली आहे. यानंतर कॅरेबियन दौऱ्यावरून परतल्यानंतर त्यांनी सांगितले की, संघातील युवा खेळाडूंवर अधिक लक्ष केंद्रीत करत आगामी टी-२० वर्ल्डकप आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या दृष्टीने तयारी करायची आहे.
याबाबत सुत्रांनी दिलेली माहितीनुसार, शास्त्री पुढे म्हणाले की, ‘आमच्याकडे टी-२० वर्ल्डकपसाठी १२ महिने आणि विश्व टेस्ट चॅम्पियनशिपसाठी जवळपास १८ ते २० महिने आहेत. ते लक्षात घेत तयारी करायची आहे. ‘सध्या झपाट्यानं बदल होत आहेत. त्या दृष्टीनं युवा खेळाडूंवर अधिक लक्ष देणे महत्वाचं आहे. त्यामुळे अनुभवी खेळाडूंसोबत त्यांचा ताळमेळ बसून एक मजबूत संघ तयार करायाचा आहे’. असे ही शास्त्री यावेळी म्हणाले.