जळगाव (प्रतिनिधी) शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात सत्ता संघर्षातून झालेल्या हाणामारी प्रकरणी मार्च २०१८ मध्ये परस्परविरोधी गुन्हे दाखल होते. याप्रकरणी आज सकाळी स्थानिक गुन्हे शाखेने अॅड.विजय भास्कर पाटील यांना अटक केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली असून जिल्हापेठ पोलीस स्थानकात मोठी गर्दी जमा झाली आहे.
या संदर्भात अधिक असे की, शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात सत्ता संघर्षातून झालेल्या हाणामारी प्रकरणी मार्च २०१७ मध्ये परस्परविरोधी गुन्हे दाखल होते. यानुसार एका गटाकडून विजय पाटील यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल होता. परंतू या प्रकरणात विजय पाटील यांना अटक झाली नव्हती. आज सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक राहत्या घरून अॅड. पाटील यांना अटक केली. दरम्यान, घरकुल घोटाळ्यात औरंगाबाद खंडपीठात संशयितांचे जामीन अर्ज प्रलंबित आहेत. या संदर्भात अॅड. पाटील यांनी विरोधात भूमिका घेऊ नये, म्हणून अचानक अटक करण्यात आल्याची चर्चा जिल्हापेठ पोलीस स्थानकात त्यांच्या समर्थकांमध्ये सुरु होती.