चाळीसगाव प्रतिनिधी । आज राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले असून त्यांच्या समर्थनार्थ चाळीसगाव तहसीलसमोर उपोषण करण्यात आले आहे.
अण्णा हजारे यांनी राळेगणसिध्दी येथे आंदोलनास प्रारंभ केला आहे. यामुळे चाळीसगाव येथील भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास मार्फत त्यांचे समर्थनार्थ येथील तहसील कार्यालयाच्या समोर एकदिवसीय उपोषणा चे धरणे आंदोलन करण्यात आले आहे. या न्यासचे तालुका संघटक विजय शर्मा हे त्यांच्या सहकार्यांसह या उपोषणात सहभागी झाले आहे सदर उपोषणास रयत सेना, एसटी कामगार सेना तसेच शहरातील इतर काही सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.