जळगाव, प्रतिनिधी | येथे सार्वजनिक मंडळ तसेच व्यक्तिगत स्वरुपात मराठी बांधवानी गणेशाची स्थापना केली आहे. मराठी बांधवाना गणेशोत्सव जेवढ्या जिव्हाळाचा आहे तेवढाच इतर समाजातील नागरिकांना देखील असल्याचेही प्रत्यय शहरातील संगम सोसायटी येथे सिंधी कुटुंबाने गणेश स्थापना करून दिला आहे.
जळगाव शहरातील संगम सोसायटी येथील सिंधी बांधव जयप्रकाश पाहूजा हे मागील १०-१५ वर्षापासून त्यांच्या घरी गणेशाची स्थापना करीत आहेत. गणेशाच्या आगमनाची ते आतुरतेने वाट पाहत असतात. प्रत्येक वर्षी नव नविन देखावे करून ते सजावट करत असतात. याची तयारी ते गणेशोत्सव सुरु होण्याच्या चार ते पाच दिवसापासून करत असतात. गणेशावर नितांत श्रद्धा असल्यचेही पाहुझा यांनी ‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज’ शी बोलतांना सांगितले. त्यांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर जास्त भर असतो. त्यांना गणेशोत्सवात त्याची पत्नी व दोघी मुली यांचे मोलाचे सहकार्य मिळत असल्याचे सांगितले. गणेशच्या आगमनाने घरात नव चैतन्य आल्याचे श्री. पाहूजा यांनी सांगितले.