एलआयसीतर्फे गुणवंत विद्यार्थाचा सत्कार

अमळनेर प्रतिनिधी । एलआयसीतर्फे येथील शांतिनिकेतन प्राथमिक व जय योगेश्‍वर माध्यमीक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनदाई कला महाविद्यालयाचे चेअरमन व. ता. पाटील यांची उपस्थिती होती. त्यांनी एलआयसी राबवत असलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. तर धनदाई संस्थेचे चेअरमन
डी.डी.पाटील यांनीदेखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला एल.आय.सी शाखा प्रबंधक एम. ए. ठाकूर, उपशाखाप्रमुख रमेश वानखेडे, नंदकुमार दयाराम पाटील ,सयाजीराव कापडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचलन शाळेचे उपशिक्षक के.डी बापू पाटील पाटील यांनी केले.आभार प्रदर्शन एस. एस.सोनवणे सर यांनी केले.

Add Comment

Protected Content