Home क्राईम निंभोर्‍यात गोळीबार; हॉटेल त्रिमुर्तीजवळील घटना

निंभोर्‍यात गोळीबार; हॉटेल त्रिमुर्तीजवळील घटना

0
39

भुसावळ प्रतिनिधी । शहरापासून जवळच असणार्‍या निंभोरा येथील हॉटेल त्रिमुर्तीजवळ मध्यरात्रीनंतर गोळीबार झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, हॉटेल त्रिमुर्तीजवळ कुणाल अहिरे (पूर्ण नाव माहिती नाही) याने किरकोळ कारणावरून गोळीबार केल्याने चार जण जखमी झाल्याने खळबळ उडाली आहे. यात समाधान साळुंखे, शेख हुसेन शेख चांद, लखवींदरसिंग, व शरीफ शहा यांचा समावेश आहे. याबाबत तालुका पोलीस स्थानकात फिर्याद देण्यात आलेली आहे. दरम्यान, घटनास्थळावरून पोलिसांनी जीवंत काडतुस जप्त केले असून आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्मित झाले आहे.

fire near nimbhora


Protected Content

Play sound