जळगाव, प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यलयात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला प्रभारी करण खलाटे, माजी खासदार वसंतराव मोरे, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी आ. डॉ. सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) रवींद्रभैय्या पाटील, जिल्हाध्यक्ष महानगर नामदेवराव चौधरी आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील इच्छुकांनी यावेळी मुलाखती घेण्यात आल्या. याप्रसंगी इच्छुकांनी राष्ट्रवादी कार्यलयात गर्दी केलेली दिसत होती.