Home Cities चाळीसगाव युवानेते मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे भव्य किर्तन सोहळ्याचे आयोजन

युवानेते मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे भव्य किर्तन सोहळ्याचे आयोजन

0
82

manges parivar

 

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील एकदंत गणेशोत्सवानिमित्त युवानेते मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे दि. 5 सप्टेंबर रोजी भव्य किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ‘आई माझी मायेचा सागर’ या प्रसिध्द गिताचे जनक, भागवताचार्य, युवा किर्तनकार व आवाजाचे जादुगार ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील (बुलढाणा) यांचे किर्तन सिताराम पहेलवान मळा, लक्ष्मीनगर येथे 5 सप्टेंबर रोजी रात्री 9 ते 11 वाजता आयोजित करण्यात आले आहे. या सोहळात बेलदारवाडीतील ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच तळवाडे मधील मृदुंगवादक ह.भ.प. नंदु महाराज दौंड, गायक ह.भ.प.संतोष महाराज वाघ (जालना) ह.भ.प. सदानंद महाराज कडुळे, पुणे हे ही संभारंभात उपस्थितीत राहणार आहेत.


Protected Content

Play sound