भुसावळ प्रतिनिधी । महावितरण विभागाचे पंचवीस हजार रूपये किंमतीचे लोखंडी पोल कापून चोरून नेणारा फरार आरोपीला नशिराबाद पोलीसांनी जेरबंद केले आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विद्यूत महावितरण कंपनीच्या मालकीचे 25 हजार रूपये किंमतीचे लोखंडी पोल एकाने चोरून नेले होते. याप्रकरणी पवन सुधाकर वाघुळदे रा. नशिराबद यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीसात भाग 5 गु.र.नं. 20/2018 भादवी कलम-379, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी आरोपी विशाल प्रेमचंद तायडे वय-30 रा भुसावळ हा फरार होता.
सदर गुन्ह्यातील गुन्हा घडल्या पासून फरार आरोपी विशाल तायडे याला गुप्त माहितीवरून भुसावळ शहरातून गोलाणी भागातून ताब्यात घेतले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत याच्या मार्गदर्शनाखाली पोना रविंद्र बिऱ्हाडे, रमण सुरळकर, पो.कॉ. विकास सातदिवे, ईस्वर भालेराव व पोना प्रविण ढाके यांनी कारवाई केली.