एरंडोल, प्रतिनिधी | येथे मंगळवारी मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी संत शिरोमणी संत सेना महाराज संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सेना महाराज मूर्तीची सर्व नाभिक समाजाच्या बांधवांनी पूजा केली. त्यानंतर समाज अध्यक्ष रामभाऊ गांगुर्डे यांनी सपत्नीक सेना महाराजांची आरती केली.गावातून वाजात गाजात पालखी मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीनंतर समाज सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम पार पडला तसेच कन्यारत्न प्राप्त झालेल्या मातांचा ही गौरव करण्यात आला. समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. देश सेवेतून निवृत्त झालेले पांडुरंग महाले यांचा शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक जगदीश ठाकुर यांचे भाषण झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन चिमणराव पाटील हे होते. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, रमेश महाजन, रवींद्र महाजन, किशोर निंबाळकर, प्रा. मनोज पाटील, राजेंद्र चौधरी, रवींद्र पाटील, नीलेश परदेशी, संजय सूर्यवंशी, जगदीश पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक समाज अध्यक्ष रामभाऊ गांगुर्डे यांनी केले. सूत्रसंचालन गणेश गांगुर्डे यांनी केले. आभार खोंडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी समाज अध्यक्ष रामभाऊ गांगुर्डे, उपाध्यक्ष शांताराम सोनवणे, सचिव सुनील महाले, उपसचिव गणेश गांगुर्डे, देवराम सोनवणे, सुधाकर सोनगिरे, प्रकाश वसाने, विठ्ठल वसाने, नीलकंठ अहिरे, अशोक गांगुर्डे, वसंत निकम, देविदास कुंवर, दत्तात्रय देवरे, किरण बोरसे, पारधी समाज बांधव उपस्थित होते.