Home धर्म-समाज मुक्ताईनगरात छत्रपती शिवरायांचा पुतळा साकारणार

मुक्ताईनगरात छत्रपती शिवरायांचा पुतळा साकारणार

0
50

मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथील नगरपंचायतीतर्फे प्रवर्तन चौकातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील जागेवर ब्रांझ धातूचा शिवरायांचा १२ फूट उंच भव्य अश्‍वारूढ पुतळा नगरपंचायतीतर्फे उभारला जाणार आहे.

आजादी महोत्सव समितीतर्फे भाजप सरचिटणीस संदिप देशमुख यांनी शिवरायांच्या पुतळ्याबाबत माजी मंत्री खडसे यांच्याकडे मागणी केली होती. याच कार्यक्रमात खडसे यांनी मागणी मान्य केली होती. तसेच नगराध्यक्षा नजमा तडवी यांच्यासह सर्व नगरसेवकांना, नगरपंचायतीच्या पहिल्या मासिक सभेत ठराव घेऊन पुतळा उभारणी समिती गठीत करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार प्रथम मासिक सभेत ठराव घेण्यात आला, तसेच पुतळा समिती गठीत करण्यात आली. यासोबत सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिसांचे नाहरकत प्रमाणपत्र व इतर परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, आमदार खडसे यांच्यासमोर औरंगाबाद येथील शिल्पकार नरेंद्र साळुंखे पाटील यांनी मॉडेल सादर केले. पुतळा निर्माण समिती अध्यक्ष संदीप देशमुख, मुख्याधिकारी श्याम गोसावी, माजी सरपंच प्रवीण पाटील, पांडुरंग नाफडे उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound