जळगाव प्रतिनिधी । के.सी.ई. सोसायटीचे अध्यापक विद्यालयात डी.एल.एड. प्रथम वर्षात नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.आर.राणे तर प्रमुख पाहुणे म्हणून जनसंवाद व पत्रकारिता विभागाचे विभाग प्रमुख प्रा.संदीप केदार उपस्थित होते.
याप्रसंगी प्रा.संदीप केदार यांनी मुलांना शिक्षण व वाचनाने होणारी जीवन घडण याविषयी मार्गदर्शन केले. तर अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.आर.राणे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षक व शिक्षकांचे भविष्यात समाज घडणीसाठी लागणारे योगदान याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमात डी.एल.एड. प्रथम वर्षात नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला डी.एल.एड. विभाग प्रमुख प्रा. दुष्यंत भाटेवाल, प्रा.एस.व्ही.झोपे, प्रा.एस.एस.तायडे, प्रा.एस.एम.पाटील, प्रा.के.एस.पावरा, जयश्री तळेले व विद्यार्थी प्रतिनिधी नेहा पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कायनात सय्यद व नयना जावरे, प्रास्ताविक नेहा पाटील तर आभार वैशाली राजपूत यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाग्यश्री माळी, काजल महाजन, नारेकर मानसी व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.