Home Cities चोपडा चोपडा येथे शुक्रवारी सर्जा-राजा बैल पोळा शर्यत

चोपडा येथे शुक्रवारी सर्जा-राजा बैल पोळा शर्यत

0
102

download 7

चोपडा, प्रतिनिधी | येथे सालाबादाप्रमाणे जय भवानी मंडळातर्फे आयोजित व माजी आमदार जगदीश वळवी मित्र मंडळ प्रायोजित सर्जा-राजा बैल पोळा शर्यत शुक्रवारी (दि.३०) सायंकाळी ५.०० वाजता रत्नावती नदी येथे आयोजित करण्यात आली आहे.

 

या शर्यतीत प्रथम येणाऱ्यास एक हजार एकशे अकरा रुपये, द्वितीय सातशे सत्त्याहत्तर तर तृतीय पाचशे पंचावन्न रुपये आणि ट्रॉफी असे बक्षीस देण्यात येणार आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन मल्हारपुरा वासीय, जय भवानी मंडळ व जगदीश वळवी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound