

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आयएनएक्स मीडिया घोटाळ्यात चौकशी सुरू असलेले माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची विदेशात १३ देशात संपत्ती असल्याचा दावा ईडीने केला आहे.

ईडीच्या म्हणण्यानुसार चिदंबरम यांची बँक खाती अनेक देशांमध्ये आहेत. अर्जेंटिना, ऑस्ट्रीया, ब्रिटीश वर्जिन, आइसलँड, फ्रान्स, ग्रीस, मलेशिया, मोनाको, फिलीपाइन्स,सिंगापूर, द. आफ्रिका, स्पेन, श्रीलंका या देशांत त्यांनी मालमत्ता बनवून बँक खातीही उघडली आहे. बनावट कंपन्यांच्या माध्यमातून या खात्यांमध्ये देण्या-घेण्याचे व्यवहार झाले आहेत, असे ईडीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. चिदंबरम यांच्या जामीन अर्जाला विरोध करताना ईडीने त्यांच्यावर पुराव्यांशी छेडछाड करण्याचा तसेच साक्षीदारांवर दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप लावला आहे.


