Home क्राईम बोदवड तालुक्यातील विचवा येथे दोन गटात हाणामारी

बोदवड तालुक्यातील विचवा येथे दोन गटात हाणामारी

0
67
royalty free rf fighting clipart illustration 1115388 by prawny bjyBdq clipart

बोदवड प्रतिनिधी । तालुक्यातील विचवा गावात मागील भांडणाच्या कारणामुळे दोन गटात तुफान हाणामारी झाली असून या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

याबाबत वृत्त असे की, काल रात्री आठच्या सुमारास फिर्यादी शंकर मोतीराम तायडे (वय ५५) हे घराजवळ सार्वजनिक जागेच्या ठिकाणी उभे असताना मागील भांडणाचा कारणावरून आरोपी जितू देवचंद तायडे याने कुर्‍हाडीने वार केला. तर देवचंद अर्जुन तायडे,विजू देवचंद तायडे,श्रावण शिवा तायडे,संतोष श्रावण तायडे,बाळू श्रावण तायडे,बंडू शिवा तायडे यांनी फिर्यादी च्या पत्नीला मारहाण केल्याची फिर्याद दिली असून संबंधीतांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक सुनील खरे यांच्या मार्गदर्शनाखाली वसंत निकम हे करीत आहेत.

तर दुसर्‍या गटातर्फे फिर्यादित फिर्यादी जितू देवचंद तायडे घरासमोरील विहिरीजवळ उभे असताना आरोपी नागेश शंकर तायडे,योगेश शंकर तायडे,मनोज शंकर तायडे,सिद्धार्थ तायडे,शंकर मोतीराम तायडे यांनी फिर्यादिस लोखंडी सळईने तसेच लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. त्यात फिर्यादी व विकास श्रावण तायडे हे जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला व हाताला दुखापत झाली आहे. या अनुषंगाने त्यांच्या फिर्यादीवरून दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोन्ही गटातील जखमी यांना उपचारासाठी जळगाव रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील खरे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्दल चौहान करीत आहे.


Protected Content

Play sound